माळीनगर (युगारंभ )-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा आयोजित केला होता. त्या अंतर्गत आज माळीनगर येथे भारतीय जनता पार्टी माळीनगर व अनुपम हॉस्पिटल अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने माळीनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.
सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर निखिल गांधी व त्यांचा स्टाफ यांनी चांगले सहकार्य केले. डॉक्टर निखिल गांधी त्यांचे मनोगत व्यक्त करताना त्यांनी असे सांगितले की ज्या पेशंटला शस्त्रक्रियेची गरज भासेल त्यांचेवर कमीत कमी खर्चामध्ये शस्त्रक्रिया केली जाईल.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन मंत्री माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुक्ताबाई कोरबू, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळीनगर ग्रामपंचायत सदस्य विराज सिंह निंबाळकर, प्रदीपदादा निंबाळकर, माळीनगर शहराध्यक्ष संतोष करंडे, भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका चिटणीस ज्ञानेश्वर पंचवाघ, किसान मोर्चा तालुका चिटणीस प्रशांत लेंगरे, एस सी सेल उपाध्यक्ष अमोल करडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन ससाने व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
जिल्हा संघटन मंत्री माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार AD प्रसाद कांतीलाल मिटकल यांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टर निखिल गांधी यांचा सत्कार शहराध्यक्ष संतोष करंडे यांनी केला. माळीनगर येथील श्री कांतीलाल मिटकल यांनी नेत्र तपासणी शिबिरासाठी जागा दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला प्रास्ताविक ज्ञानेश्वर पंचवाघ यांनी केले व आभार शहराध्यक्ष संतोष करंडे यांनी व्यक्त केले.