अकलूज (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलित श्री.जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय संग्रामनगर या शाखेत गुणवत्ता वाढ व विकास उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सहविचार सभा संपन्न झाली.
सभेच्या प्रस्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बी.टी शिंदे सरांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पालक-शिक्षक समन्वय,संपर्क असल्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उणीवा दूर करता येतील असे प्रतिपादन केले.इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका कु.दोरकर मॅडम यांनी प्रथम घटक चाचणी च्या निकालाचे वाचन केले नंतर एस.एस.सी बोर्ड आवेदनपत्रासाठी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स जमा करावे असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बी टी शिंदे सरांनी विद्यार्थी आरोग्य, गणवेश, शालेय शिस्त, अभ्यासातील नियमितपणा, अभ्यासाचे वेळापत्रक यातच गुणवत्ता वाढीचे बीजे असतात असे सांगताना संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील तथा बाळदादासाहेब व संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील तथा आण्णासाहेब व संस्थेच्या संचालिका मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी SMP app च्या माध्यमातून कोरोना काळात देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून या ॲपच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल हे बघितले त्यामुळे आज देखील गुणवत्ता टिकून आहे असे सांगितले त्याबद्दल सरांनी आभार व्यक्त केले.
या सहविचारसभेस प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.महादेवराव अंधारे साहेबांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ व शिस्त पाळावी असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणांमध्ये सांगितले. सहविचार सभेच्या अध्यक्षा मा.सौ.निशा गिरमे मॅडमनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत व बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त, गणवेश याबाबत शिस्त पाळण्यास सांगितले. गृहपाठ वर्गपाठ वेळेत पूर्ण करून लेखनाचा सराव करावा असे देखील सांगितले.
विभाग प्रमुख कु. पेटकर मॅडम यांनी देखील अभ्यास कशाप्रकारे करावा याचे मार्गदर्शन केले तदनंतर पालकांच्या प्रश्नाला उत्तर देताना लेखन सराव अनिवार्य असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले तसेच सभेची विद्यार्थी व पालक यांची बैठक व्यवस्था एकत्र केल्यामुळे पालकांनी आभार व्यक्त केले.
सदर सभेचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री.एस.डी. माने सरांनी केले सदर सभा पार पाडण्यासाठी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.रशिद मुलाणी सर व सेवक नवनाथ राऊत व श्री. जयसिंह मोहिते-पाटील संकुलातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.