माळीनगर (युगारंभ )- दि 09/10/2022रोजी बहुजन समाज पार्टी माळीनगर सेक्टर च्या वतीने BSP,बामसेफ, DS4चे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या परिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्त तमाम भारतीयांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला मुस्लिम बांधव व बहुजन समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा सचिव अमोल बनसोडे, माळशिरस विधानसभा उपाध्यक्ष विक्रम वाघमारे, माळीनगर अध्यक्ष प्रभाकर सरवदे , संजय माने ,अमोल कांबळे, सिद्धार्थ तावरे, अमर डावरे, महेश खंडांगळे, सिद्धार्थ कांबळे, प्रीतम कांबळे, सागर बाळछत्रे ,रोहित सोनवणे,शैलेश झोडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.