उठा-उठा दिवाळी आली आकाशकंदील बनविण्याची वेळ झाली असे म्हणत मुलींनी ७०० आकाशकंदील बनवून नवनिर्मितीचा आनंद लुटला.
माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थिनींनी शाळेमध्ये स्वतः ७०० आकाशकंदील बनवून नवनिर्मितीचा आनंद लुटला.
उठा-उठा दिवाळी आली आकाशकंदील बनविण्याची वेळ झाली असे म्हणत मुख्याध्यापक कल्लाप्पा सुर्यवंशी व पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख यांच्या आवाहनाला साद देत मुलींनी घोटीव कागद,एम.एस.पेपर,कार्डशीट,जिलेटीन पेपर,रंगीबेरंगी मणी व टिकल्या यांचा वापर करून आकर्षक वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदील बनविले.
यावेळी रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका राजश्री निंभोरकर व कला विभाग प्रमुख माधुरी भांगे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.