लवंग (युगारंभ )-युवा सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अकलूज स्मशानभूमी मधे गद्दारांची अंत्ययात्रा काढून निषेध नोदवण्यात आला .
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की काल रात्री निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृत पक्षाचे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवले .त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठला आहे,जरी तुम्ही शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असेल तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच चिन्ह आमच्यासाठी पुरेसे आहे .भले तुम्ही चिन्ह गोठवाल,भले तुम्ही पक्षाचे नाव गोठवाल,पण आमच्या रक्तात बाळासाहेबांनी लावलेली आग कशी गोठवाल? तुमच्या कडे इडी,सीबीआय, ईसी, असेल तर आमच्याकडे महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. एकनाथ शिंदे म्हणत होते- मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे, शिवसेना पुढे घेऊन चाललो आहे .पण तुम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाणच आज गोठवले .एकनाथ शिंदे तुम्ही महाराष्ट्रात भाजपची रखेल म्हणून काम करत आहात असे सिद्ध झाले .
या अंत्ययात्रेवेळी अकलूज युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे, बाबुलाल तांबोळी,भैय्या राऊत,मिलिंद मोरे,सतिश कुलाल,दत्ता साळुंखे,पप्पू कुपाडे, गणेश भिताडे, बच्चन साठे,शिवराम गायकवाड, प्रशांत पराडे, युवराज पवार, सागर साळुंखे, विकास भोई, संकेत इंगळे, राकेश घळके, नितीन इंगळे सिधू गायकवाड, करण कांबळे, गणेश साळुंखे ई युवासैनिक उपस्थित होते.