अकलूज(युगारंभ ): येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त “वाचन प्रेरणा दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. अमित घाडगे हे होते. तर अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.
प्रमुख वक्ते प्रा. अमित घाडगे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विषद केले. ते पुढे म्हणाले की, वाचन साहित्याचे स्वरूप बदलले असले तरी वाचनाचे आणि वाचकांचे स्वरूप बदलले नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चतुरस्त्र वाचनाची नित्तांत आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुल सुर्वे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कू. तृप्ती जाधव हिने मनोगत व्यक्त केले. कु. आरती पवार हिने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचे PPT च्या माध्यमातुन सादरीकरण केले. यावेळी “वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे का?” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कु. पल्लवी रणपिसे व कु. साक्षी भोसले या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
“आपण पुस्तके का वाचावे?” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. ऋषी गजभिये यांनी केले. सूत्रसंचलन कु. आरती पवार व आभार प्रदर्शन कु. शिवानी हेगडे हिने केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. छाया भिसे, डॉ. भारती भोसले, डॉ. राजश्री निंभोरकर, डॉ. जयशीला मनोहर, श्रीमती दिपा येंजाडे, रमजान शेख व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.