अकलूज (युगारंभ )-कला , क्रीडा, सांस्कृतिक , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने समाजातील गरजू लोकांना दिवाळी चा सण साजरा करता यावा, या उद्देशाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या वतीने रत्नाई मिठाई विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. 
सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या रत्नाई मिठाई केंद्राचे उदघाटन मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा मा.कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. प्रताप पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी मंडळाच्या कार्याची,उपक्रमाची माहिती दिली. अनेक वर्षापासून मंडळाने मा.बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्तुत्य उपक्रम, राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ‘रत्नाई मिठाई’ हा देखील सामाजिक बांधिलकीतुन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सुरु केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यास ग्राहकांचा देखील यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी ३७५०/- किलो विक्री झाली होती यंदाही यास भरघोस प्रतिसाद मिळत असून २९८९/- किलो ऍडव्हान्स बुकिंग झाले आहे. नियमित विक्रीही जोमाने चालू आहे.
यानंतर मा. बाळदादांच्या शुभहस्ते प्राथनिधीक स्वरूपात ग्राहकांना ‘रत्नाई मिठाई’ चे वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मा. बाळदादांनी मंडळाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश सांगितला. मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम, उदबोधनपर कार्यक्रम, राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. हीच धुरा मंडळाच्या नूतन अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील समर्थपणे पार पडत आहेत.‘रत्नाई मिठाई’ हा देखील स्तुत्य उपक्रम असून पूर्वी ‘इंदिरा मिठाई’ या नावाने हा उपक्रम चालू होता. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरातील सर्व सदस्य एकत्र बसून मिठाई करत होते व दिवाळी सणाचा आनंद घेत असत परंतु वर्तमानकाळात बदलती कुटूंब व्यवस्था व कामाच्या व्यापामुळे महिलांना फराळ करण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे या उपक्रमामुळे महिलांचा त्रास कमी होणार असून किफायतशीर दरात स्वादिष्ट पदार्ध मिळणार आहेत. तरी या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन दादांनी केले.
सदर रत्नाई मिठाई वाटप केंद्र , मारुती मंदिराजवळ , शंकरनगर येथे असणार आहे . दि . १९ ते २१ ऑक्टोबर २०२२ या काळात सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत सुरू राहणार आहे. सदरच्या केंद्रात चिवडा लाडू , बालुशाही, शंकरपाळी, व शेव इत्यादी फराळाचे पदार्थ “किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहेत. हे पदार्थ स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले आहेत. या केंद्रात चिवडा १ किलो- रु .२३०/-, लाडू १ किलो – रु.२४०/- , बालूशाही १ किलो – रु.२४०/- , शंकरपाळी- १ किलो – रु.२३५/- , शेव – १ किलो -२३० / – असे किफायतशीर दर ठेवण्यात आले आहेत. मिठाईच्या मागणीसाठी नामदेव कुंभार- 9511808004, जयंतराव माने देशमुख – 7720067824 , शिवाजीराव पारसे -8329590065 , बाळासाहेब सावंत – 9960195839 यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे सचिव मा. श्री. पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष तात्या आसबे, मोहित इनामदार, बाळासाहेब सावंत, मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, खजिनदार वसंतराव जाधव, संचालक यशवंतराव माने देशमुख, राजेंद्र देवकर , बिभिषन जाधव , संग्राम रणनवरे , फिरोज तांबोळी , सुहास थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.