लवंग (युगारंभ )-एबीपी माझा च्या बातमीची दखल घेत युवासेना सोलापूर जिल्हा तर्फे युवासेना जिल्हाप्रमुख मा.सचिनजी बागल, युवासेना जिल्हाप्रमुख मा.गणेशजी इंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख मा.बालाजी चौगुले, युवासेना जिल्हाप्रमुख मा.महेशजी देशमुख, युवतीसेना जिल्हा प्रमुख साक्षी भिसे यांच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुटेवडगाव येथील ज्ञानेश्वर चव्हाण मो नं 7588535249 या गरीब शेतकरी कुटुंबाला वीस हजार रुपये (20,000) मदत केली.
एबीपी माझा संभाजीनगर चे रिपोर्टर कृष्णा केंडे यांनी चव्हाण कुटुंबाची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये दहा वर्षाच्या मुलाला विचारले “बाळा तुला दिवाळीला कपडे घेतली का”?तेंव्हा त्याने उत्तर दिले -“नाही घेतली”. परत रिपोर्टर कृष्णा केंडे यांनी त्याच बाळाला विचारले तू कपडे का घेतली नाहीत तर त्या मुलाने सांगितले वडिलांकडे पैसे नाहीत .हे ऐकून मन सुन्न झाले. गणेश इंगळे यांनी लगेच त्या मुलाला मदत करण्याचे ठरवले आणि युवा सेनेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी सचिन बागल,महेश देशमुख, बालाजी चौगुले, साक्षी भिसे यांना फोन करून चव्हाण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सांगितली,तेव्हा लगेच या पाच पदाधिकाऱ्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता वीस हजार जमा केले परंतु त्यानंतर परत एक अडचण आली.चव्हाण कुटुंबाचे फोन पे,गुगल पे हे असले काहीच नव्हते कारण त्यांचे कोणत्याही बँकेत खाते नव्हते .हे ऐकून परत मन सुन्न झाले . गणेश इंगळे यांनी चव्हाण यांना कोणाचे तरी अकाऊंट नंबर द्या आम्ही त्यावर मदत करतो असे बोलल्यानंतर चव्हाण यांनी त्यांच्या बहिणीच्या पतीचे अकाऊंट नंबर दिले -भगवान गोटे फोन पे नंबर 7020388535 हा दिला आणि त्या नंबर वरती युवा सेनेच्या माध्यमातून वीस हजार रुपयाची मदत युवा सेनेच्या पाच जिल्हा प्रमुखांनी केली.
हा दिखावा नसून सगळ्याना नम्र विनंती आहे आपण सर्वानी पण पुढाकार घेऊन त्या कुटुंबाची मदत करावी किंवा अशा ओल्या दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाची मदत करावी जेणे करून त्यांना दिवाळी साजरी करण्यास मदत होईल असे आवाहन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
(सोबत -युवासेनेचे पाच जिल्हाप्रमुख )