लवंग (युगारंभ )-दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य गरीब जनतेला दिलासा मिळावा यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा वितरण सुरू केले आहे. लवंग ता. माळशिरस येथील भिलारे वस्ती येथे हा आनंदाचा शिधा लवंगचे माजी सरपंच उत्तम भिलारे यांच्या हस्ते वितरण करण्यात आला.

महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत आहे . १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तुंचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.
या योजनेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.ऐन सणाच्या तोंडावर 100 रुपयांत या 4 वस्तू मिळाल्याने शिंदे सरकार गरिबांच्या घरची दिवाळी गोड करण्यात यशस्वी झाल्याचे मत यानिमित्त उत्तम भिलारे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी युवा नेते सदानंद भिलारे,प्रशांत भिलारे, ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.