December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाठळक बातम्यापरिसर

अकलूज येथे प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा दिमाखात संपन्न

माळीनगर (युगारंभ )-कला, क्रीडा, सांस्कृतीक, समाजीक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आज रविवार दि. 13/11/2022 रोजी आयोजित केलेल्या बालक्रीडा स्पर्धेचे उद्धघाटन जिजामाता कन्या प्रशालेच्या सभापती मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.

    विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे सदर स्पर्धेसाठी प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, मा.श्री. दिपकराव खराडे-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मा.श्री. हर्षवर्धन खराडे-पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री. महादेव अंधारे, खजिनदार मा.श्री. वसंत जाधव, सचिव मा.श्री. पोपट भोसले-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य मा.श्री. उत्कर्ष शेटे, प्रताप क्रीडा मंडळाचे सदस्य यशवंत माने-देशमुख, बिभीषण जाधव, राजेंद्र देवकर,नंदकुमार गायकवाड, भानुदास आसबे, फिरोज तांबोळी, सुहास थोरात, विविध शाखेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

प्रारंभी प्रताप क्रीडा मंडळाच्या स्पर्धेचे उद्घाटन मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांचेहस्ते ध्वजारोहण करून झाले. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील व श्रीमती स्व. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ' महर्षि गीत' ही सादर झाले.


स्पर्धेच्या मैदानाचे पूजन मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले व स्पर्धेला प्रारंभ झाला. मा.सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांनी सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

   तत्पूर्वी प्रास्ताविकात स्पर्धा प्रमुख शिवाजी पारसे म्हणाले, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाल मुलांच्या अंतरीक गुणांना व कौशल्यांना विकसित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये बालवयातच खेळाप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती होऊन त्यांची योग्य वाढ व्हावी, आदी हेतूने या बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. १९७८ साली मा. बाळदादांनी स्थापन केलेल्या प्रताप क्रीडा मंडळाने अनेक कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवून व राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा राबवून देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे.


या बाल क्रीडा स्पर्धेत लहानगट (वय ४+) यांचेसाठी असणाऱ्या डोक्यावर चेंडू घेऊन पळणे २० मीटर या गटात ३२१ स्पर्धक, मोठा गट (वय ५+) यांचेकरीता धावणे ५० मीटर या गटात ३६८ स्पर्धक, इयत्ता १ ली (वय ६+) साठी कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे २५ मीटर यासाठी ४४२ स्पर्धक, इयत्ता २ री (वय ७+) लंगडी घालत जाणे ५० मीटर गटात ३२८ स्पर्धक, इयत्ता 3 री (वय ८+) साठी तीन पायांची शर्यत ५० मीटर गटात ४४० स्पर्धक व इयत्ता ४ थी (वय ९+) साठी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे ३० मीटर या गटात ३५० स्पर्धक असे मिळून एकूण ६ गटात १२१८ मुले व १०११ मुली अशी एकूण २२२९ स्पर्धकांनी सहभाग घेतला.सदरच्या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

  प्रताप क्रीडा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेसाठी विविध समित्या नियोजनबद्ध कार्यरत होत्या. स्पर्धेसाठी ८ प्रशस्त मैदाने सज्ज होती. नियोजनबद्ध स्पर्धा पार पाडण्यासाठी विविध समित्या कार्यरत होत्या.
प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सहभागी प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. सकाळपासूनच क्रीडा संकुलची गॅलरी पालकांनी व प्रेक्षकांनी गच्च भरली होती. बालकांचा व पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मंडळाच्या वतीने सर्व स्पर्धकांना खाऊ वाटपही करण्यात आले.

स्पर्धेतील गटनुसार प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे –
लहानगट – (मुली) – डोक्यावर चेंडू घेऊन पळणे

या गटात

 • प्रथम – कु. प्रार्थना चव्हाण,
 • द्वितीय – आरोही पवार,
 • तृतीय – कु. विनया मगर,
 • (मुले) – प्रथम – हसनैन शेख,
 • द्वितीय – हर्षद गुरळकर,
 • तृतीय – अभिश्रेय मदने
मोठा गट – (मुली) ५० मीटर धावणे या गटात
 • प्रथम – कु. दुर्गा केमकर,
 • द्वितीय – कु. योगी घोडके,
 • तृतीय – कु. राजनंदिनी जाधव,
 • (मुले) – प्रथम – निरंजन पवार,
 • द्वितीय – तेज लावंड,
 • तृतीय – श्रीराज महादार
इयत्ता १ ली कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे
 • (मुली) प्रथम – कु. तमन्ना खान,
 • द्वितीय – कु. जिनत मुलाणी,
 • तृतीय – कु. अन्वेशा बनकर,
 • (मुले) – प्रथम – आर्यन गमे,
 • द्वितीय – मानव काटकर,
 • तृतीय – श्लोक सरगर,
इयत्ता २ री लंगडी घालत जाणे
 • (मुली) – प्रथम – कु. श्रेया मदने,
 • द्वितीय – कु. स्वरा वाळेकर,
 • तृतीय कु. संस्कृती पोळ,
 • (मुले) – प्रथम – सार्थक शिंदे,
 • द्वितीय – शिवेंद्र भोसले,
 • तृतीय – पृथ्वीराज कांबळे
इयत्ता 3 री – तीन पायाची शर्यत

(मुली) सर्व क्रमांक विभागून

 • प्रथम कु. राजनंदिनी दुपडे,कु. अंकिता काळे,
 • द्वितीय – कु. साई थिटे, कु. धनश्री मंडलीक,
 • तृतीय कु. श्रेया इंगळे, कु. माही साठे.
 • (मुले) – सर्व क्रमांक विभागून 
 • प्रथम – विहान मगर, तेजस गायकवाड,
 • द्वितीय – शिवराज मगर, श्रेयस मगर,
 • तृतीय – आदित्य भोसले, श्लोक खंडागळे.
इयत्ता ४ थी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे

 • (मुली) – प्रथम – कु. श्वेता कोडम,
 • द्वितीय – कु. सायली गायकवाड,
 • तृतीय – कु.अनुष्का शिंदे,
 • (मुले) – प्रथम – मुजफ्फर गालीब,
 • द्वितीय – सौरभ चव्हाण,
 • तृतीय – प्रज्वल फलटणकर, यांचेसह अनेक उत्तेजनार्थ बक्षीसेही स्पर्धकांनी पटकावली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. सूत्रसंचलन किरण सूर्यवंशी व आर.आर. पाटील यांनी केले. प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते ध्वजावतरण करून स्पर्धेचा समारोप झाला.

Related posts

महर्षि संकुल,यशवंतनगर’ येथे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची पुण्यतिथी साजरी

yugarambh

प्रगत व कृतिशील विचारधारा मा. गणेशजी करडे सर

yugarambh

माळीनगर प्रशालेत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

yugarambh

माळीनगर येथील शिक्षक सत्यवान विठ्ठल साळुंखे यांचे निधन

yugarambh

शिक्षक संघटनेत महादेव राजगुरू यांची माळशिरस तालुका अध्यक्षपदी व सचिव पदी रमेश भोसले यांची निवड

yugarambh

गाईला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढीसाठी शिवसेनेकडून अनोखे आंदोलन : संतोष राऊत

yugarambh

Leave a Comment