माळीनगर (युगारंभ )-अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र, माळीनगर यांच्या संयुक्त समन्वयाने दिनांक 14. 11 .2022 रोजी ‘माता सुरक्षित घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते .
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉ. संकल्प जाधव मेडिकल ऑफिसर, डॉ. प्रियांका शिंदे मेडिकल ऑफिसर , डॉ. गौरव जाधव सामाजिक आरोग्य अधिकारी, श्रीमती रेखा पवार आरोग्य सेविका, श्रीमती दिपाली शिंदे आरोग्य सेविका, श्रीमती शैला ओतारी आशा सुपरवायझर, श्रीमती निकिता लोखंडे आशा वर्कर, श्रीमती जयश्री साठे आशा वर्कर, श्रीमती आशा वाघमारे आशा वर्कर, श्री संजय इंगळे लॅब टेक्निशियन यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला.
या उपक्रमअंतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब व रक्तातील शुगर याची तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींना व कर्मचाऱ्यांना काही आरोग्य विषयक तक्रारी असतील तर त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विटामिन सी ,आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. सदर शिबिरामध्ये एकूण 113 विद्यार्थिनी व 15 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. भारती भोसले यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले . तसेच या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजश्री निंभोरकर, डॉ. ऋषी गजभिये, डॉ. छाया भिसे, डॉ. जयशीला मनोहर, प्रा. अमित घाडगे, प्रा. के. के. कोरे तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री विजय कोळी, सुनिता काटे, रमजान शेख, श्री दीपक शिंदे यांनीही विशेष परिश्रम घेतले.