माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील इयत्ता प्रमुख सुवर्णा क्षीरसागर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख,इयत्ता प्रमुख मारूतराव शिंदे,संगिता राजमाने तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेषभूषेत विद्यार्थी शिवेंद्र राजेंद्र भोसले, हर्षराज विजय पाटील, हर्षल मनोज ढोक, असद तौफिक मुलाणी व्यासपीठावर उपस्थित होते. 
सर्वप्रथम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रशालेत शिक्षक गणेश करडे यांनी आपल्या भाषणातून पंडितजींच्या बालकांप्रती असलेल्या आपुलकीची माहिती स्पष्ट केली,त्यानंतर विद्यार्थी शिवेंद्र राजेंद्र भोसले, संस्कृती समाधान मिसाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तसेच प्रताप क्रीडा मंडळ आयोजित बालक्रीडा स्पर्धेतील यश संपादन केलेल्या सर्व खेळाडू, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शुभांगी किरगत यांनी मानले
यावेळी दुसरी ते चौथी सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.