माळीनगर(युगारंभ )-स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३३ वी जयंती येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर येथे बालदिन म्हणून साजरी करण्यात आली.
स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील जेष्ठ शिक्षक वसंत पिंगळे तसेच प्रशालेतील बालविद्यार्थी सानिका होनमाने व प्रसन्न गोफणे यांचे हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे,पर्यवेक्षक रितेश पांढरे,शिक्षक बाळासाहेब भोसले,दत्तात्रय अवघडे,कल्याण कापरे,सविता क्षीरसागर-पांढरे आदी उपस्थित होते.

यावेळी सिझा मुलानी,वैष्णवी नेवसे,सोनम शिंदे, ईश्वरी गोरे,सानिका होनमाने आदी विद्यार्थिनींनी पंडित नेहरू यांचे विषयी विचार मांडले.यावेळी या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बाल दिनानिमित्त खाऊ व पेन भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय बांदल यांनी मानले.