December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

पीपल्स रिपब्लिकन पार्टी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या प्रांत कार्यालयासमोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन

माळीनगर (युगारंभ )-पीपल्स रिपब्लिकन पार्टी व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी अकलूज कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोलापूर जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संटक सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

मागण्यांमध्ये

 • मौजे अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील अकलूज क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलला असणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व सदर हॉस्पिटलला मुंबई नर्सिंग ॲक्ट च्या नियमाचा भंग होत असल्याने सदर हॉस्पिटलची इतर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सखोल चौकशी करून यातील सर्व दोषींवर कडक कायदेशिर दंडात्मक कारवाई करून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा,
 • अकलूजसह माळशिरस तालुक्यातील खराब झालेले डांबरी रस्ते त्वरित नव्याने बांधून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा,
 • सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना पूर्वीप्रमाणे रेशन दुकानातून धान्य सुरू करावे
 • संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्पन्न दाखला सादर करण्याची अट रद्द करावी,
 • विजयवाडी येथील सुमंगल हॉस्पिटलची चौकशी करून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा
 •  अकलूज नगरपरिषद अंतर्गत गणेशनगरला लागून असलेल्या क्रांतिसिंहनगर इंदिरा घरकुल येथील मानवी वसाहतींमधील सिमेंट रस्ते त्वरित करून द्यावेत,
 • अकलूज नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व सार्वजनिक शौचालयांचे अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे ती शौचालये त्वरित नव्याने बांधून मिळावीत
 • तसेच नगरपरिषद अंतर्गत असणारे गाळेधारक नागरिक यांना त्यांना जवळ होईल अशा ठिकाणी स्त्री पुरुष शौचालयांची व्यवस्था करावी,
 • अकलूज नागरी वसाहतींमधील गटारी तुंबलेल्या आहेत ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे या सर्व तुंबलेल्या गटारी स्वच्छ करून कचरा उचलून प्रत्येक ठिकाणी डासांची फवारणी करण्यात यावी,
 • अकलूज महादेवनगर येथील नागरिकांच्या रहिवासी भागामध्ये सुरू असलेल्या शिवरत्न रोलिंग शटर्स हे दुकान येथील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सदर दुकान सील केले होते तरीही सदर दुकान मालक दुकानाच्या बाहेर रोलिंग शटर चे काम करून येथील नागरिकांना मानसिक त्रास देत आहे त्यामुळे सदर मालकावर गुन्हा दाखल करून सदरचे काम त्वरित बंद करून येथील नागरिकांना दिलासा द्यावा,
 • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अकलूज विभाग अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या कार्यालयाचे सर्व प्रकारचे ऑडिट करून यातील सर्व दोषी अधिकारी कर्मचारी यांचेवर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे,
 • अकलूज नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या अकलूज माळीनगर या पालखी महामार्गावरील विजय कुलकर्णी यांचे अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम अतिक्रमण त्वरित काढून संबंधित गाळे मालकावर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी

या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, बांधकाममंत्री,विरोधी पक्ष नेता,महाराष्ट्राचे मुख्य सचिव, आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांचेसह सर्व विभागांनाही पाठविले होते.

आजचे आंदोलन करूनही सदरच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित विभागांचे आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आझाद मैदान मुंबई येथे करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य,सोलापूर जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी आंदोलन स्थळी बोलताना सांगितले.यावेळी या आंदोलनाला भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे,हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक तालुकाध्यक्ष रविराज बनसोडे सरचिटणीस प्रेमसिंह कांबळे पाटील, चौंडेश्वरवाडीचे माजी सरपंच सतीश शिंदे यांनी पाठिंबा दिला त्यानंतर सदर मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांना देण्यात आले.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,पंढरपुर तालुकाध्यक्ष सचिन जाधव,तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड,कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे,शहर कार्याध्यक्ष कबीर मुलाणी,अमोल भोसले,युवराज गायकवाड,उंबरे पागे गावचे अध्यक्ष राजू गायकवाड,उपाध्यक्ष विकास धोत्रे,बिरुदेव हुबाले,सुरज कसबे,शहाजी खडतरे,आकाश गायकवाड,ऋतुराज थोरात,राजू बागवान,अजय साळुंखे,रियाज बागवान,कुणाल तोरणे,मेघराज तोरणे,गणेश साळुंखे,कोहिनूर चव्हाण,मल्हारी काटे,आदर्श गायकवाड,चंद्रकांत कोळी,बाबासाहेब ननवरे,बाबासाहेब चव्हाण,वैभव अंबुरे,सचिन भिसे,अमोल गौड,अभिषेक शिंदे,वाहिद पठाण,विकास क्षेत्रा यांचेसह मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या.

Related posts

महर्षि संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

yugarambh

श्री जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर मधील बालचमुनी भरवला आठवडा बाजार

yugarambh

मंत्री  सावंत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार गणेश जाधव यांचे मेल द्वारे निवेदन.

yugarambh

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अकलूज येथे उद्‌घाटन..

yugarambh

शिवामृत-चेअरमन मा.धैर्यशील(भैय्यासाहेब) मोहिते पाटील व व्हॉईस चेअरमन पदी मा.दत्तात्रय भिलारे(भाऊ )

yugarambh

लवंगच्या तृप्ती गेजगेचे ग्रीन बेल्ट कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

yugarambh

Leave a Comment