December 1, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हाराजकीयराज्य

नमामि चंद्रभागा प्रकल्पांतर्गत निरा नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण व्हावे.-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

माळीनगर (युगारंभ )-; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि स्वच्छ नद्या अभियानांतर्गत भारतातील विविध नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रकल्प चालू आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नमामि चंद्रभागा या प्रकल्पाची घोषणा केली होती व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासंदर्भात उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने चंद्रभागानदीचे (भीमा) उपखोरे असलेल्या अकलूज येथील निरा नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण होणे गरजेचे आहे अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता फडणवीस यांनी संबंधित विभागाना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

आमदार मोहिते-पाटील म्हणाले अकलूज हे औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सोलापूर जिल्ह्यातील एक अतिशय महत्त्वाचे शहर आहे. नुकतीच येथे नगरपरिषदेची स्थापना झाली आहे. अकलूज शहरास भीमा नदीच्या नीरा या उपनदीचे सानिध्यही लाभले आहे. शहरात निरा नदीच्या काठी ऐतिहासिक अकलूजचा भुईकोट किल्ला व किल्ल्यातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी निर्माण केली आहे. तसेच नदीकाठी अकलाई देवीचे सुंदर निसर्गरम्य मंदिर आहे.
अकलूज पासून जवळच निरा नरसिंहपूरचे पुरातन तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. तसेच अकलूज शहर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावर वसलेले असून या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो, या पार्श्वभूमीवर अकलूज शहराची यशस्वी पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी निरा नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करणेसाठी खालीलप्रमाणे कामे होणे गरजेचे आहे.

▶️निरा नदीला मिळणा या नाल्यांचे पूर्ण सर्वेक्षण करणे.

▶️निरा नदी व नाल्यामधील प्रदूषण करणा-या घटकांची ओळख, निश्चितीकरण आणि निर्मूलनाकरता लागणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करणे,

▶️निरा नदीच्या दक्षिण तटाचे किल्ला शिवसृष्टीच्या दोन्ही बाजू लगत असणा-या नदीच्या काठाचे सुशोभिकरण, घाटांची निर्मिती, हरित पट्ट्याची निर्मिती जॉगिंग ट्रॅक, उद्यानांची निर्मिती तसेच खुल्या व्यायामशाळा, मेडिटेशन सेंटर यांची निर्मिती करणे.

▶️निरा नदी व नाल्यातील गाळ काढणे,

▶️नदीतील पाण्याची शुध्दता, विद्राव्य प्राणवायूचे प्रमाण फायटोरे मेडिएशन व बायोरेमेडिएशन पध्दतीने वाढवणे.

▶️पर्यटन वृध्दी, नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणे, रोजगार निर्मिती करिता विविध उपाययोजना करणे.

▶️निरा नदीमध्ये तरंगत्या उद्यानांची निर्मिती करणे.

वरील सर्व उपाययोजनांकरिता सक्षम, सुयोग्य व अनुभवी सल्लागाराची निवड करणे. सदर प्रकल्पामुळे पर्यटन वृध्दी, रोजगार निर्मिती तसेच निरा नदीचे स्वच्छता होणार असल्यामुळे या प्रकल्पाचा गांभिर्याने विचार होऊन राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा तसेच केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत राज्यशासनकडून देखील शिफारस व्हावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.मोहिते-पाटील यांनी केली.

Related posts

मंत्री तानाजी सावंत यांच्या मराठा आरक्षण वक्तव्या बाबत धैर्यशील मोहिते पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन 

yugarambh

तब्बल 32 वर्षानंतर पंचवटीत आले वॉटर सप्लायचे पाणी ; नागरीकांनी मानले विजयसिंह  मोहिते-पाटील यांचे आभार

yugarambh

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी गाऱ्हाणे

yugarambh

यशवंतनगर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न

yugarambh

माळीनगर -लवंगची ‘शाही ‘ ग्रामपंचायत निवडणूक

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

yugarambh

Leave a Comment