लवंग (युगारंभ )– सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना 2022- 23 मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रति मे टन रुपये 2200 प्रमाणे प्रथम ऍडव्हान्स देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
चालू गळीत हंगाम 2022-23 मध्ये सुमारे 14 लाख मे टन ऊसाचे गाळप करण्याचे कारखान्याने उद्दिष्ट ठेवले असून प्रतिदिवस 8500 मे टना पेक्षा जास्त उसाचे गाळप होत आहे. कारखाना गळीत हंगाम चालू 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर अखेर पर्यंत गळीतास आलेल्या 1,72 864 मे टन उसाच्या प्रथम ऍडव्हान्स ची रक्कम दिनांक 29 नोव्हेंबर रोजी संबंधित ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे,सुरेश पाटील,धनंजय चव्हाण,शंकराव माने देशमुख,विजय माने देशमुख, विजयकुमार पवार,रावसाहेब मगर,मिलिंद कुलकर्णी,राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे,विश्वास काळकुटे,चांगदेव घोगरे, भारत फुले, भीमराव काळे, बाबुराव पताळे,सतीश शेंडगे, संचालिका सौ माधुरी लोंढे,श्रीमती कमल जोरवर,श्रीमती कुमाबाई क्षिरसागर, कामगार संचालक मोहित इनामदार, आदींसह धनंजय दुपडे,विनायक केचे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे,नितीन निंबाळकर, चंद्रशेखर दुरापे,अमरसिंह माने देशमुख,नामदेव चव्हाण,रणजीत रणवरे तसेच कारखान्याच्या सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.