अकलूज (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व १५०० विद्यार्थिनींनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले.विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुनील कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्तिकी जाधव या विद्यार्थिनीने भाषण केले.कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या शोभा खराडे यांनी संविधानाचे महत्व पटवून सांगितले व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुनील कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे त्यानुसार सर्वांनी आचरण करावे.
यावेळी स्टेजवरती मुख्याध्यापक कल्लाप्पा सुर्यवंशी, पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख,सुनील कांबळे व शोभा खराडे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आठवी मधील देवश्री झगडे,अंकिता जाधव,आदिती कनकधर व शरयू फडतरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृष्टी राऊत हिने केले.सूत्रसंचालन सायमा तांबोळी व तनिशा जैन हिने केले.तर आभार अंजली चव्हाण हिने मानले.