December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसरव्हिडिओ

श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक व माध्यमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये ‘संविधान दिन’ साजरा

माळीनगर (युगारंभ )-दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक व माध्यमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला, तसेच जनजागृती अभियानांतर्गत प्रभात फेरी चे आयोजन देखील करण्यात आले होते.

प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशाला समिती सदस्य मा.श्री महादेवराव अंधारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व मुलाकडून संविधान वाचन करून घेण्यात आले. प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या प्रभात फेरीमध्ये प्रशाला समितीच्या सभापती मा. सौ. निशा गिरमे मॅडम व प्रशाला समिती सदस्य मा.श्री महादेवराव अंधारे साहेब यांनी स्वतः सहभागी होऊन घोषणा देऊन मुलांचा उत्साह वाढवला.

अध्यक्षीय भाषणामध्ये अंधारे साहेबांनी संविधानाचे महत्त्व तसेच,संविधानातील आपले अधिकार जसे महत्वाचे आहेत तसेच आपले कर्तव्य देखील महत्त्वाचे आहेत ते देखील आपण संविधानाच्या अधीन राहून प्रत्येक नागरिकांनी ते बजावले पाहिजेत असे सांगितले .

तसेच प्रशालेतील शिक्षक श्री माने सर यांनी संविधान याविषयी आपले विचार व्यक्त केले इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी कु. मयुरी अनपट हिने इंग्रजी भाषेतून संविधान विषयी आपले विचार व्यक्त केले.संविधान दिनानिमित्त प्रशालेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रशाला समिती च्या सभापती मा. सौ निशा गिरमे मॅडम, प्रशाला समिती सदस्य मा.श्री.महादेवराव अंधारे साहेब प्रशालेचे,प्रभारी मुख्याध्यापक श्री.रशीद मुलाणी सर व प्रशालेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. देवयानी चौधरी व कु. सिद्धी मोदळे या विद्यार्थिनींनी केले तसेच प्रास्ताविक कु. तृप्ती पाटील व आभार कु. श्रेया कुपाडे या विद्यार्थ्यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related posts

अकलूज गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

yugarambh

जि.प.शाळा रावबहाद्दूर गट, बिजवडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात 

yugarambh

वृद्ध कलावंतांना वाढीव निधी मिळण्याबाबत अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे निवेदन

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

yugarambh

माळीनगर मध्ये विविध ठिकाणी भारतरत्न डाॅ आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

yugarambh

Leave a Comment