अकलूज (युगारंभ )-भारतीय संविधान दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अंगणवाडीतील लहान मुलांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते जिलेबी व बिस्कीट वाटप करण्यात आले.
अकलूज येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील लहान मुलांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
त्यानंतर गणेशनगर अकलूज येथील आंगणवाडीमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंगणवाडीतील लहान मुलांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते जिलेबी व बिस्किट वाटप करण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, युवक तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड,अकलूज शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे, शहाजी खडतरे,वैभव अंबुरे यांच्यासह आंगणवाडी सेविका, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.