माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (बाळदादा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज शाळेत वार्षिक क्रिडा महोत्सवाचे आयोजन प्रशाला समिती सभापती स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (दिदीसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
दि. 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत या स्पर्धा घेण्यात आल्या.
या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक क्रीडाप्रकारात 50मीटर व 100मी धावणे तर सांघिक स्पर्धेत इयत्ता पहिली- दुसरी लंगडी, रस्सीखेच स्पर्धा तर तिसरी-चौथी साठी रस्सीखेच, कबड्डी आणि खो-खो स्पर्धेचे आयोजन क्रीडाविभागाच्या वतीने करण्यात आले.
-
या मध्ये लंगडी स्पर्धा
इयत्ता पहिली- मुले ब, मुली ब,
इयत्ता दुसरी मुले अ1, मुली ब
-
रस्सीखेच स्पर्धा
इयत्ता पहिली मुले इ1, मुली ब1,
दुसरी मुले क1, मुली अ,
तिसरी मुले ब1,मुली ब1,
चौथी मुले अ,मुली क1
-
खो-खो स्पर्धा
तिसरी मुले क1, मुली ब1
चौथी मुले ब, मुली ब1
-
कबड्डी स्पर्धा
तिसरी मुले क1 मुली ब1
चौथी मुले फ1 , मुली ब1
आदी वर्गातील संघानी विजेतेपद पटकावले.
यावेळी प्रशाला समिती सदस्या वैशाली कुलकर्णी यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धा प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांच्या नियोजनानुसार घेण्यात आल्या यावेळी क्रीडाप्रमुख हनुमंत किर्दक, सहाय्यक युवराज बनपट्टे, ज्ञानोबा मोरे, नरसिंह पाटील, आदिनाथ जाधव तसेच सर्व वर्ग शिक्षक यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले .