माळीनगर (युगारंभ )-शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळणे गरजेचे असते याच उद्देशाने सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे ‘कृष्णप्रियोत्सव ‘ वार्षिक स्नेहसंमेलनाचे व विविध कलादालनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाट्न शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रताप पाटील सर यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन संमेलन साजरे करण्याचा हेतू व उद्देश स्पष्ट केला.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितीत सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यार्थी प्रतिनिधी कु. स्वरांजली माने देशमुख व शौनक कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यानंतर विद्यालयाच्या वार्षिक ‘धर्मवीर’ अंकाचे व हस्तलिखितांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. बसवराज शिवपुजे यांनी शालेय जीवनात स्नेहसंमेलन ही एक मनोरंजनाची मेजवानी असून विद्यार्थ्यांनी त्याचा भरपूर आस्वाद घ्यावा असे सांगितले. डॉ. अंजली कदम यांनीही शाळा कलागुणांचा विकास करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे त्याचा आनंद घ्यावा,शाळेतील दिवस एन्जॉय करावेत असे सांगितले.
कार्यक्रमानंतर विद्यालयातील १७४२ विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कला दालनाचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला, हस्तकला, पुष्परचना, रांगोळी अंधश्रद्धा, ग्रंथालय, विज्ञान प्रदर्शन, कृषीप्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन इत्यादी दालने तयार करण्यात आली.मा. संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी सर्व कलादालनाची पाहणी करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. चित्रकला दालनास 20000 व इतर दालनास रोख 30000 रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस दिले.
११ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२२ या कालावधीत समूहनृत्य, फनी गेम्स, कविसंमेलन, सयाजीराजे संगीत वाद्यवृंद हे कार्यक्रम दोन सत्रात साजरे होणार आहेत.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य इकबाल काझी, मनोज रेळेकर, माजी मुख्याध्यापक अंकुश भाकरे , एल डी बाबर सर, मुख्याध्यापक संजय गळीतकर, अमोल फुले, संजय मुंगसे, श्रीकांत राजमाने, पत्रकार, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील सर व सुनीता ठोंबरे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या शिक्षक शिक्षकेत्तर यांनी परिश्रम घेतले.