माळीनगर (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज शाळेचे वर्षिक स्नेहसंमेलन ‘जयोत्सव 2022-23’ चे आयोजन दिनांक 13 , 14 आणि 15 डिसेंबर रोजी स्मृतीभवन यशवंतनगर अकलूज याठिकाणी करण्यात आले.
दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (बाळदादा)यांचे शुभहस्ते पार पडले.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संचालक उत्कर्ष शेटे, बाळासाहेब सणस, प्रशाला समिती सदस्या वैशाली कुलकर्णी, जावळे वहिनी, कृष्णराज माने आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांनी केले
त्यानंतर आनंदयात्री बालवाद्यवृंदातील कलाकारांनी गीत सादरीकरण केले लगेचच समूहनृत्य स्पर्धेतील तिसरी चौथी गटाचे नृत्य सादरीकरण करण्यात आले.
संस्थेच्या संचालिका तथा प्रशाला समिती सभापती स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पालकांचे उद्दंड प्रतिसादाबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करडे सर आणि गिरिश सूर्यवंशी यांनी केले.
दिनांक 14 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय जावीर तर दिनांक 15 रोजी माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.