माळीनगर (युगारंभ ) -कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ४२ व्या शालेय मुला मुलींच्या समूह नृत्य स्पर्धेचा प्रारंभ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, नटराज पूजन व रंगमंचावर श्रीफळ वाढवून दिमाखात झाला.
यावेळी सहकार महर्षी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन स्पर्धेतील बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपारांणी मोहिते पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, तहसीलदार जगदीश निंबाळकर, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, अँड. नितीन खराडे पाटील, परीक्षक प्रा. पंकज पवार, किरण लोंढे, डॉ. सागर भजनावळे, उपाध्यक्ष प्रताप पाटील, खजिनदार वसंतराव जाधव, सचिव पोपटराव भोसले पाटील, स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर, विश्वनाथ आवड, पोपटराव देठे, अमोल फुले मंडळाचे सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, मागील ४२ वर्षांपूर्वी स्पर्धेचा ठराविक साचा होता. आज यामध्ये प्रचंड गुणवत्ता वाढली असून शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाहेरील संघ ही स्पर्धेमध्ये येत आहेत .त्या संघाचा वेगळा गट तयार करून ग्रामीण भागातील शाळांना मंडळांनी अनुदान द्यावे अशी सूचना केली. यावेळी तात्काळ अतिग्रामीण गटातील शाळांना रुपये पाच हजाराचे अनुदान मंडळाचे अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी जाहीर केले.
जगदीश निंबाळकर म्हणाले, नृत्य ही कला व छंद असून निसर्गाची अभिव्यक्ती आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळत आहे. प्रस्ताविकात स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर म्हणाले, १९७८ साली प्रताप क्रीडा मंडळाची स्थापना झाली. १९८० पासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी समूह नृत्य स्पर्धेला प्रारंभ केला. या स्पर्धेमुळे अनेक चित्रपट, टीव्ही कलावंत, नृत्यांगणा, नृत्य दिग्दर्शक, दिग्दर्शक निर्माते म्हणून उदयाला आले. या स्पर्धेत पूर्वी सादर झालेल्या यल्लमा गीताला व लावणी गीताला सोशल मीडियावर सुमारे एक कोटी २० लाख लोकांनी पसंती दिली.
सदरच्या स्पर्धा १ ली ते ४थी शहरी व ग्रामीण गट,५ वी ते ७वी शहरी व ग्रामीण गट,८वी ते १०वी लोकनृत्य अति ग्रामीण, ग्रामीण व शहरी पाश्चिमात्य नृत्य गट, ५ वी ते १० वी प्रासंगिक शहरी ग्रामीण गट ,व ११वी ते महाविद्यालयीन थीम डान्स गट अशा पाच गटात होत असून यामध्ये एकूण ९३ संघाच्या गीतातून १२९५ विद्यार्थी कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पार पडलेल्या १ली ते ४थी शहरी गटात
प्रथम क्रमांक महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,
तर द्वितीय क्रमांक (विभागून)
-
सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,
-
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय नातेपुते,
-
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्राथमिक शाळा वेळापूर यांनी पटकावला.
तर ग्रामीण गटात
-
प्रथम श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे,
-
द्वितीय कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती,
-
तृतीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी या शाळांनी पटकावला.
उपस्थितांच्या हस्ते रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचलन किरण सूर्यवंशी, आर. आर. पाटील यांनी केले.