अफवांवर विश्वास ठेऊ नका
माळीनगर (युगारंभ )- वीज वितरणचे कर्मचारी हे त्यांच्या काही मागण्यांसाठी उद्या दि 4 /1/2023 पासून 72 तासासाठी संपावर जाणार आहेत. त्यांच्या या संपाच्या घोषणेबाबत सोशल मीडियावर विविध फेक मेसेज व्हायरल होत असून तीन दिवस राज्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याच्या अफवा परसविल्या जात आहेत.
याच विषयी आम्ही वीजवितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता- आम्ही आमच्या मागण्यांसाठी संपावर जात असून कसल्याही प्रकारचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही. मात्र संपा दरम्यान जर विजेच्या बाबतीत काही तांत्रिक बिघाड झाला तर तो संप मिटेपर्यंत पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना विनंती करण्यात येते की, शासन महावितरण मध्ये खाजगीकरणाचे धोेरण अमलात आणीत असल्यामुळे तिनही कंपनीतील सर्व ३१ संघटना आज रात्री पासुन खाजगीकरणाला विरोध म्हणुन ७२ तास संपावर जात आहेत. परंतू समाज माध्यमातून वर पुढील तीन दिवस विज बंद असेल असे चुकिच्या पद्दतीने वीज ग्राहकांमध्ये गैरसमज पसरविण्यात येत आहे.
ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे की, शासन हे वीजउद्योग भांडवलदाराच्या ताब्यात देऊन जनतेची दिशाभुल करत आहे. संपकरी जनतेसाठी तसेच,स्वतः साठी संप करीत असून वीजपुरवठा अबाधित ठेवूनच संपावर जात आहेत. यापुढे संप काळामध्ये वीज पुरवठा बाधीत झाल्यास वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील . आपल्या व आमच्या भल्यासाठी सहकार्य असावे.
संयुक्त वीज बचाव कृती समीती,
बारामती