December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाठळक बातम्या

विद्यार्थ्यांनी जनतेला फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी – धनंजय देशमुख

माळीनगर (युगारंभ )-आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात.विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून जनतेला फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी असे आवाहन माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी केले,ते अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

प्रशालेतील ४२५ मुलींनी वैज्ञानिक उपकरणे,चित्रकला प्रदर्शन, पुष्परचना व हस्तकला प्रदर्शनात सहभाग घेतला होता.

      यावेळी कार्यक्रमासाठी अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव,अकलूज नगरपरिषदेचे सिटी सर्व्हे विभागाचे अधिकारी मनोज गवळी,प्रशाला समिती सदस्या मनीषा चव्हाण, शशिकांत कडबाने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.मुलींनी स्वतः बनविलेल्या वैज्ञानिक उपकरणे,पुष्पगुच्छ व हस्तकलेचे साहित्य पाहून प्रमुख अतिथींनी त्यांचे कौतुक केले.

    विद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख सुनील कांबळे यांनी प्रस्ताविकेमध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल माहिती सांगितली.

   यावेळी मुख्याध्यापक कलाप्पा सुर्यवंशी, पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख, गोरख पिसे,प्रवीण गोडसे, अनुराधा निंबाळकर,तानाजीराव भोसले,दिपाली राजमाने,आशा निंबाळकर, माधुरी भांगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री कणबुर यांनी केले तर सुहास पवार यांनी आभार मानले.

Related posts

आदिवासी पारधी कॅम्प सवतगव्हाण येथे पहिल्यांदाच डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

yugarambh

श्री जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर मधील बालचमुनी भरवला आठवडा बाजार

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळे बिस्कीट वाटप

yugarambh

उत्कर्ष विद्यालय सांगोलाची प्रतापगड- रायगड दर्शन सहल उत्साहात संपन्न!

yugarambh

हिंदू खाटीक समाज संघटनेच्या निवडी जाहीर

yugarambh

वाघोली ग्रामपंचायतीवर खंडोबा ग्रामविकास परिवर्तन गटाचे वर्चस्व

yugarambh

Leave a Comment