माळीनगर -(युगारंभ )-विदयार्थ्यांनी जीवनाचा आनंद घ्यावा तसेच मुलींना भरपूर संधी असतात त्या संधीचं त्यांनी सोनं करावं असे मत प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगरच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले त्या अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे संचालक वसंतराव जाधव,बाळासाहेब सणस,रामभाऊ गायकवाड, तुकाराम टिंगरे व प्रशाला समितीच्या सदस्या उपस्थित होत्या.
सुरुवातीला विद्यालयाच्या रत्नाई वाद्यवृंदामधील मुलींनी विविध गीतगायनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले त्यामध्ये गणेशवंदना,वारकरी नृत्य, कोळी नृत्य,शेतकरी नृत्य, भरतनाट्यम, मंगळागौर, गोंधळी गीत,गरबा,शिवचरित्र व देशभक्तीपर आशा विविध गीतांच्या नृत्यांचे सादरीकरण झाले.
माऊली-माऊली या ६१ कलाकारांनी साकारलेल्या गीताबरोबर प्रेक्षकानीही ताल धरला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक कल्लापा सुर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन सुहास पवार, राजश्री कणबुर,रोहित माने,स्नेहल वाळेकर,सिद्धी इनामदार,अवंती कदम,साक्षी कोडलकर,गायत्री बोरावके, आदिती मोहिते,समृद्धी शिंदे,सृष्टी लवटे यांनी केले तर आभार यशवंत माने-देशमुख यांनी मानले.