माळीनगर (युगारंभ )-सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब यांच्या 105 व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय व प्राथमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये करण्यात आले होते. काकासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशालेमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी व प्रशालेतील शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले व महर्षि गीत गायनाने काकासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशाला समितीच्या सभापती मा.सौ. निशा गिरमे होत्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समिती सदस्य मा.श्री.महादेवराव अंधारे साहेब होते. तसेच प्रशाला समिती सदस्य मा.श्री. यशवंत साळुंखे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
कै. काकासाहेब यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये संग्रामसिंह मोहिते- पाटील मित्र मंडळ,अकलूज आयोजित 17 व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रशालेने शहरी मुले गटात- तृतीय क्रमांक पटकावला तसेच प्राथमिक विभागाने देखील तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रमुख अतिथी मा.सौ.निशा गिरमे मॅडम व मा.श्री.महादेवराव अंधारे साहेब तसेच मा.श्री.यशवंत साळुंखे साहेब व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी. टी. शिंदे सर यांच्या हस्ते लेझीम खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लेझीम मार्गदर्शक प्रशिक्षक नवनाथ राऊत यांचा देखील सत्कार प्रमुख अतिथी मा.श्री महादेवराव अंधारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
कै. काकासाहेब यांच्या जीवनावरती प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपले विचार भाषणातून व्यक्त केले.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.बी.टी. शिंदे सर यांनी सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते- पाटील यांनी कठीण परिस्थितीतून व अथक परिश्रमातून आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणक्रांती, धवल क्रांती, औद्योगिकक्रांती कशी घडवून आणली हे आपल्या भाषणातून सांगितले.
याप्रसंगी प्रशाला समिती सभापती मा.सौ.निशा गिरमे मॅडम प्रशाला समिती सदस्य मा. श्री.महादेवराव अंधारे साहेब, मा. श्री.यशवंत साळुंखे साहेब तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बी.टी शिंदे सर व प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर व सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.संतोषी नरवडे व कु.ज्ञानेश्वरी कदम यांनी केले व आभार प्रदर्शन कु. सना शेख हिने केले.