माळीनगर (युगारंभ )-कोरोनाकाळातील आणि सध्या बंद स्थितीत असलेल्या अकलूज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख १५ हजारांचे साहित्य जळून भस्मसात झाले. या घटनेची अकलूज पोलिस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे.
पर्यटन विकास महामंडळ यांचे इमारतीमध्ये एप्रिल 2021 मध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले होते.सदर सेंटर आक्टोंबर 2021 पर्यंत सुरु होते. शासनाच्या आदेशानुसार नंतर सदरचे कोव्हिड सेंटर बंद करण्यात आले होते.
दि. 21/01/2023 रोजी दुपारी 12.00 वा. च्या सुमारास सदर कोव्हिड सेंटरच्या हाॅलमध्ये ठेवलेले साहित्य त्यामध्ये 500 गादी, 250 बेडशीट, 450 उशी, 350 चादर, 100 बकेट, 5 ड्रम सॅनिटायझर, 400 उशी कव्हर, 4 सिलींग फॅन, 150 झाडू, 40 ड्रम फिनेल, 150 टाॅवेल, 5 लोखंडी काॅट, 100 अंघोळीचे मग व स्टेशनरी साहित्य असे अंदाजे एकुण 3,15,000/- रुपये किंमतीचे साहित्याचे कशाने तरी जळून नुकसान झालेले आहे.
त्याबाबत विलास सुखदेव झुरळे (वय 43) रा. प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी दिलेल्या खबरीवरुन अकलूज पोलीस ठाण्यात जळीत दाखल करण्यात आले असून त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण पिंगळे हे करीत आहेत.