December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाठळक बातम्यापरिसर

समूह नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या लवंग शाळेचा प्रथम क्रमांक 

लवंग (युगारंभ ): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लवंग ता.माळशिरस यांनी सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तर शोध चाचणी सन 2022-23 अंतर्गत समूहनृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात प्रथम क्रमांकाची बाजी मारली.

         प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता . यामध्ये ‘बानु नवरी नटली…. मल्हारी पिवळा झाला’ हे समूहनृत्य सादर करून लवंग शाळेच्या बालकलाकारांनी सर्वोत्तम कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली आणि अतिशय रंगतदार झालेल्या अटीतटीच्या लहान गटाच्या समूहनृत्य स्पर्धेमध्ये माळशिरस तालुक्याने पंढरपूर तालुक्यावर बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला .

      विजेत्या आणि उपविजेत्या बालकलाकारांना दक्षिण सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी पाथरुड साहेब यांच्या हस्ते विजेतेपदाची ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे , राजशेखर नागनसुरे, जयश्री सुतार उपस्थित होते.

        विजेत्या लवंग शाळेतील बालकलाकारांना मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख नितीन साने, लालासाहेब गायकवाड, बशीर मुलाणी, दिलीप मुळे, शरद काळे, शीतल वाघ, जाविद मुलाणी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी अभिनंदन केले.त्याचप्रमाणे शाळेच्या या यशाबद्दल संपूर्ण गावामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Related posts

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे.

yugarambh

माळशिरस तालुक्यात लंपीच्या लसीचा काळाबाजार… पशुवैद्यकिय अधिकारी व खाजगी व्यक्तींची मिलीभगत

yugarambh

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अकलूज येथे उद्‌घाटन..

yugarambh

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे- बाळदादा

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न

yugarambh

अकलुजमध्ये “त्रिमुर्ती चषक” कुस्ती स्पर्धेची जंगी सुरुवात….

yugarambh

Leave a Comment