माळीनगर (युगारंभ )-आज 26 जानेवारी 2023 रोजी श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय संग्रामनगर प्रशालेमध्ये 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रशाला समितीच्या सभापती मा. सौ.निशा गिरमे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशाला समिती सदस्य मा.श्री महादेवराव अंधारे साहेब, मा.श्री. यशवंत साळुंखे साहेब व माजी पोलीस निरीक्षक मा.श्री.दळवी साहेब उपस्थित होते.
आज प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक, प्राथमिक विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सामाजिक सलोखा या विषयावर गीत सादर केले.तसेच प्रशालेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट व अप्रतिम असे लेझीम सादर केले व शारीरिक कवायत, देशभक्तीपर समुहगीत गायन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेच्या प्राथमिक विभागातील छोट्या गटातील चि.वेदांत घोडके या विद्यार्थ्यांनी अतिशय गोड आवाजामध्ये देशभक्तीपर गीत गायन केले,तसेच मोठ्या गटातील कु. देविका मोहिते, इयत्ता तिसरी मधील ज्ञानेश्वरी उबाळे व इयत्ता चौथी मधील कु.वेदा काळे या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मधून प्रजासत्ताक दिनाविषयी आपले विचार भाषणातून सांगितले. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेतून प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती आपल्या भाषणांमधून सांगितली.
प्रमुख अतिथी प्रशाला समिती सदस्य मा.श्री. महादेवराव अंधारे साहेब यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना,पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रशालेतील सर्व उपक्रमाबद्दल सर्व विद्यार्थी- शिक्षक यांचे अभिनंदन केले व पालकांच्या सहकार्याबद्दल पालकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी प्रशाला समिती सभापती मा.सौ. निशा गिरमे मॅडम, प्रशाला समिती सदस्य मा.श्री. महादेवराव अंधारे साहेब,मा.श्री. यशवंत साळुंखे साहेब, माजी पोलीस निरीक्षक या.श्री.दळवी साहेब, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा.श्री. बी.टी. शिंदे सर, प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.फिरोज तांबोळी सर तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.माने सर यांनी केले.