माळीनगर(युगारंभ )-युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व शिवसैनिक रज्जाक मुलाणी यांच्या वतीने संगम जिल्हा परिषद शाळेस वह्या कंपास आणि पाटी वाटप करण्यात आले . यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनम ताई अभंगराव, युवासेना उपजिल्हाप्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील व युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या हस्ते करून आगतराव पराडे, रमेश इंगळे, बाळासाहेब जाधव, विश्वास ताटे देशमुख, रमेश काकडे,भुषण भैय्या पराडे,सतिश इंगळे,युवा सेना उपतालुकाप्रमुख दुर्वा आडके, दत्ता भाऊ साळुंखे, डॉ निलेश कांबळे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले .
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनम ताई अभंगराव म्हणाल्या की कोरोना च्या आर्थिक महामारीतून शेतकरी वर्ग बाहेर पडतो न पडतो तोवरच महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरटे मोडले. शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत असल्याकारणाने मुलांकडे दुर्लक्ष व्हायला लागले हे लक्षात घेता युवा सेनेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा संगम येथील मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.युवा सेना ही सतत सामाजिक गोष्टीमध्ये अग्रेसर असते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे सचिन पराडे,शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख पूर्वा पांढरे,जयश्री इंगळे, निता इंगळे,अप्पा महाडिक, कल्याण इंगळे, लव्हा पराडे, गणेश पराडे,गोविंद मिटकल,बबन पराडे ,विकास भोई, दयानंद इंगळे,मोनू इंगळे,समीर शेख, शुभम भोई, प्रशांत पवार,साहेबराव पवार,राजू चमरे,राजू ठोकळे, सर्जेराव लावंड इ. शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारी यांचे आभार जिल्हा परिषद संगम शाळेचे मुख्याध्यापक भारत सलगर,विजय भोसले,सूरज शिर्के, विजय हेगडे दतात्राय कदम सर यांनी मानले