December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाराज्य

उत्कर्ष विद्यालय सांगोलाची प्रतापगड- रायगड दर्शन सहल उत्साहात संपन्न!

अकलूज (युगारंभ )-दिनांक 28 व 29 जानेवारी 2023 रोजी उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवी व नववीचे सहल ‘ प्रतापगड रायगड- दर्शन’ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली.

       शनिवार दिनांक 28 जानेवारीच्या सकाळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी दर्शनाने सहलीची प्रसन्न सुरुवात झाली. भारतातील ‘पहिले पुस्तकांचे गाव – भिलार’ ला विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचा अनमोल ठेवा पाहत स्ट्रॉबेरीचा आनंद लुटला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर झुंजार माची, भवानी मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सर्वजण स्वराज्याची राजधानी रायगडाकडे रवाना झाले.

       दिनांक 29 चा सकाळी उत्कर्षच्या शिवसैनिकांनी जल्लोषात शिवगर्जना करत दुर्गदुर्गेश्वर रायगड चढाईस सुरुवात केली. रायगडावरील गंगासागर तलाव, हत्ती तलाव, हनुमान टाकी, शिरकाई देवी, बाजारपेठ, राणी वसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, शिवदरबार,मेघडंबरी, टकमक टोक इत्यादी ऐतिहासिक स्थळांची पाहणी करत जगदीश्वराचे दर्शन घेऊन सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. रायगड मोहिमेनंतर सर्वांनी समतेचे प्रतीक चवदार तळ्याला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी हक्काच्या सत्याग्रहाचा इतिहास श्री संचित राऊत सरांच्या तोंडून अनुभवला. शेवटी महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील मनसोक्त खरेदीने सहल सांगोला कडे रवाना झाली.

      मुख्याध्यापक श्री. सुनील कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख श्री. संचित राऊत सर, रवी कुंभार सर, सावंत सर, भोसले मॅडम, कडव मॅडम, गंगथडे मॅडम, शेख मॅडम, मंगेश कुलकर्णी, सर्वगोड मॅडम, गावडे सर, दौंडे मॅडम, कदम मॅडम व वर्षा मावशी यांनी सदरची सहल यशस्वीपणे पार पाडली

      श्री. रवि कुंभार सर यांनी सहलीचे सुंदर क्षण कॅमेराबद्ध केले. या सहलीसाठी प्रशांत भोसले सर, महेश फुले सर अविनाश पोपळे सरांचे विशेष सहकार्य लाभले.

Related posts

माळशिरस तालुक्यातील विज कामासाठी निधी द्या : आ. रणजितसिंह मोहिते पाटील 

yugarambh

शंकरनगर येथे 348 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुर्नस्थापना सोहळा

yugarambh

तांबवे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वह्या वाटप

yugarambh

प्रहारचे आमदार बच्चू कडूंना दोन वर्षाची शिक्षा

yugarambh

श्री अनिल प्रभाकर जाधव सर यांना राज्यस्तरीय कै. आर्वे सर स्मृती आदर्श क्रीडा (क्रिकेट/बास्केटबॉल कोच) प्रशिक्षक पुरस्कार प्रदान 

yugarambh

आमिष दाखवले लग्नाचे, केला अत्याचार ;माळीनगरच्या आरोपीला मिळाला पोलिसांचा पाहुणचार

yugarambh

Leave a Comment