माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुवार (ता. २) रोजी खंडाळी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. सुनिता सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे हे होते.
याप्रसंगी खंडाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. सुरेखा पताळे, माजी सरपंच दत्तात्रय रिसवडकर, रावसाहेब भोसले, ॲड. शहाजी इंगोले देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अमर रिसवडकर, अशोक पताळे, रिकेश चव्हाण, मिलिंद खरात, शिवाजी शिंदे, नानासो चंदनकर, राजू गोसावी, महेश पताळे, महादेव साबळे, समाधान पताळे, पत्रकार मंगेश सोनार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सारिका महाजन, सिकंदर तांबोळी तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले, डॉ. ऋषी गजभिये, डॉ. जयशीला मनोहर, प्रा. के. के. कोरे, कार्यालय प्रमुख विजय कोळी, अविनाश पताळे, दिपक शिंदे, रमजान शेख व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले यांनी केले. सुत्रसंचलन कू. पल्लवी रणपिसे व आभार प्रदर्शन कू. सृष्टी पवार हिने केले.
हे विशेष श्रमसंस्कार शिबिर २ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येत आहे. युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास, संरक्षित अन्नपदार्थ व पोषक पूरक पदार्थ, एल पी जी वापराबाबत सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण, कौशल्य विकास, प्रथमोपचार, अंधश्रद्धा निर्मुलन, भरतकाम कार्यशाळा, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या व उपाय योजना इत्यादी विषयांवर तज्ञ व्यक्तींची व्याख्याने त्याचबरोबर वृक्षारोपण, जनजागृती रॅली, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.