माळीनगर (युगारंभ )-आज सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन व उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय श्री. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील(आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी संस्थेचे सर्व विश्वस्त, सचिव-श्री. राजेंद्र केरबा चौगुले, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहायक आयुक्त श्री. सचिन जाधव उपस्थित होते. तसेच मेळाव्यास मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (बाळदादा) यांनी सदिच्छा भेट दिली.
माळशिरस तालुका व तालुका बाहेरील 950 युवक व युवतीनीं या रोजगार मेळाव्या मध्ये सहभाग नोंदवला. सदर मेळाव्या मध्ये एकूण 28 नामांकित कंपनी यांच्याकडे असलेल्या 2000 हून अधिक रिक्त पदांसाठी मुलाखती पार पडल्या अशी माहिती माननीय कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (दिदीसाहेब) यांनी दिली.
रोजगार मेळाव्या मध्ये सहभागी कंपनी:
१. एशियन मॅनपावर कन्सल्टन्सी सोलापूर
२. टाटा स्ट्राइव्ह पुणे
३. किरण एंटरप्राइजेस सोलापूर
४. स्वामी रत्न रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर
५. ग्राम तरंग टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे
६. एन आय आय टी लिमिटेड मुंबई
७. पंचायत समिती, माळशिरस
८. आर के इंटरप्राईजेस सोलापूर
९. साई श्रद्धा ग्रुप तळेगाव पुणे
१०. महर्षी अपेरियल मार्केट यार्ड अकलूज
११. भास्करे इन्फोटेक अकलूज
१२. एस जी गिअर टेंभुर्णी एमआयडीसी
१३. फ्रटेली वाइन्स प्रायव्हेट लिमिटेड झंजेवाडी माळशिरस
१४. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकर नगर अकलूज.
१५. सयाजीराजे पार्क अकलूज
१६. सहकार असोसिएट अकलूज
१७. भरणे ऑटो लाईन्स माळेवाडी अकलूज
१८. योगीराज इंडस्ट्रीज बारामती एमआयडीसी
१९. कॉलिटी गॅजेस अँड कॉम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरिंग पुणे
२०. शिवामृत दूध संघ विजयनगर
२१. इको बोर्ड इंडिया लिमिटेड
२२. विठ्ठल इलेक्ट्रिकल्स
२३. पियाजो लिमिटेड, पुणे
२४. चैतन्य इंडिया सोलापूर
२५. युनीगोल्ड लिमिटेड, लोणी
२६. पंचायत समिती, सांगोला
२७. विघ्नहर्ता इंडस्ट्रीज, अकलूज.
२८. कोहिनूर इंडस्ट्रीज लोणी इंदापूर