लवंग (युगारंभ )- श्री.जयसिंह मोहिते-पाटील पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये सहकार महर्षि शंकरराव नारायणराव मोहिते- पाटील उर्फ काकासाहेबाच्या 44 व्या पुण्यतिथी च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी शिंदे सर व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व व्याख्याते अभिजीत कुरळे सर महाराज(सहशिक्षक श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील प्राथमिक शाळा मांडवे) हे होते.
काकासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी, मुख्याध्यापक व प्रशालेतील सर्व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले,नंतर महर्षि गीतातून काकासाहेबांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. काकासाहेबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमातील स्पर्धा तसेच,विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा व विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी अभिजीत कुरळे सर महाराज व प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी शिंदे सर यांच्या हस्ते शालेय साहित्य तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार व गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अभिजीत कुरळे सर यांनी आपल्या भाषणातून काका साहेबांनी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी केलेला त्याग तसेच तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा प्रत्येक घरापर्यंत कशाप्रकारे पोहचवली व त्यासाठी किती कष्ट व मेहनत घेतली हे अनेक उदाहरणातून सांगून अशा त्यागी व्यक्तिमत्त्वांमध्ये देव शोधावा असे आपल्या कीर्तनपर भाषणामध्ये विचार मांडले.
तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये
प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी शिंदे सर यांनी काकासाहेबांनी ‘जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करू !!!!!’ हे आपले ब्रीद शेवटपर्यंत जोपासले त्यामुळे त्यांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांना विनम्र अभिवादन केले, बक्षीस पात्र व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून असाच आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा हीच खरी काकासाहेबांना आदरांजली आहे असे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून सांगितले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी शिंदे सर, व्याख्याते अभिजीत कुरळे सर, प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडम व प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
शेवटी सारे जहाँ से अच्छा हे गीत गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.