लवंग (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत आज सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील काकासाहेब यांची ४४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.निखिल मिसाळ सर होते. तसेच माता-पालक संघाच्या सदस्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम व सर्व इयत्ता प्रमुख उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि काकासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी महर्षि गीत सादर करून कै.काकासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
इ.४ थी मधील विद्यार्थी चि.साई सतीश भोसले याने काकासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर जनसेवा संघटना आयोजित सहकार महर्षि काकासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त बालचित्रकला स्पर्धा दि.१० फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या होत्या.यामध्ये प्रशालेतील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तद्नंतर वार्षिक स्नेहसंमेलनातील सहभागी छोटा गट व मोठा गट तसेच इयत्ता १ ली ते ४ थी च्या सहभागी वर्गांचे व क्रमांक प्राप्त केलेल्या वर्गांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन कु.जाधव मॅडम यांनी केले.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकार महर्षिंचे शिक्षण व सहकार प्रसाराचे कार्य सर्वोच्च आहे. उत्तम कारभार,सजग मन,सामाजिक जाणीव, निस्वार्थ वृत्ती, माणसं जोडण्याची कला, समाजाभिमुख धोरणे या सर्वांचे मूर्तिमंत प्रतिक असणारे सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून त्रिवार मानाचा मुजरा…..
त्यानंतर सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉ.निखिल मिसाळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रदीप मिसाळ सर यांनी केले.
