माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज,संचलित;महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला,प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महर्षि संकुल,यशवंतनगर’ येथे माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची 44 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील नामवंत कायदे सल्लागार ॲड. दिलीप फडे , सहाय्यक निरीक्षक शितल शिंदे- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज,उत्कर्ष शेटे संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, अॅड .नितीन खराडे, सभापती, महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, संजय गळीतकर -मुख्याध्यापक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, सौ. सुनीता वाघ -मुख्याध्यापिका लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, शिवाजी पारसे-मुख्याध्यापक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, प्राथमिक विभाग, यशवंतनगर हे मान्यवर उपस्थित होते.
सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांच्या 44 वी पुण्यतिथी निमित्त उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रतिमापूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी पारसे सर यांनी केले . लक्ष्मीबाई कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. तनिष्का होनमाने हिने हिंदी भाषेतून काकासाहेब यांचे जीवन कार्य- याविषयी माहिती दिली.कु. श्रावणी बनसोडे हिने इंग्रजी भाषेतून- काकासाहेब यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला
प्राथमिक विभागाची विद्यार्थिनी कु.वृषाली कारमकर हिने काकासाहेब यांचे विषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना तिने काकासाहेब यांचे सहकार क्षेत्रातील योगदान तसेच त्यांचे सामाजिक कार्य याविषयी माहिती दिली.
शिक्षक मनोगत महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, प्राथमिक विभाग :सहशिक्षक -देवानंद साळवे यांनी व्यक्त केले.त्यांनी काकासाहेब यांचे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा,शैक्षणिक कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. वसंत व्याख्यानमाला, पुणे येथे काकासाहेब यांनी दिलेले ओघवत्या शैलीतील भाषणाची आठवण देखील त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांनी आयत्यावेळी आलेल्या कुस्तीगीर परिषदेचे आयोजन अत्यंत नियोजनपूर्वक करून कुस्तीगीर परिषद कशा पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडली याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत काकासाहेब व त्यांचे महान कार्य सर्वांसमोर मांडले .
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शितल शिंदे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगत असताना त्यांनी अठरा वर्षांच्या आतील मुले व मुली यांनी वाहन चालवू नये, अपघात घडल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार धरले जाते अशा प्रकारची माहिती दिली.

कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे कायदे सल्लागार अँड. दिलीप फडे यांनी सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांच्या विषयी असणारे स्वतःचे अनुभव तसेच, आपणही समाजाचे काही देणे लागतो आणि सामाजिक कार्यात आपणही सहभाग घेतला पाहिजे असे मार्गदर्शनपर विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून महषिॅ संकुल येथे शैक्षणिक वर्ष 2022/23 वर्षात संपन्न झालेल्या विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रशाला समिती सदस्य-नवनाथ पांढरे, नितीन इंगवले देशमुख, कैलास चौधरी,अनिल जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेच्या सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांनी केले. आभार लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचे सहशिक्षक संतोष मगर यांनी मानले.