December 8, 2023
yugarambh
Breaking News
राज्यराष्ट्रीय

भारताचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

अकलूज (युगारंभ )-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दि.१६ व १७ फेब्रुवारी २०२३ रोजी “भारताचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात नव्या शैक्षणिक धोरणातील अनेक मुद्द्यांवर विचारमंथन घडून आले.

    “जुनी शिक्षणपद्धती बदलून अभ्यासक्रमात लवचिकता येणे ही आजच्या काळाची महत्वाची गरज होती. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पुढच्या पिढीसाठी बदलाच्या अनेक संधी देवू करणारे आहे. शिक्षकांनी बदलाची मानसिकता तयार केल्यास भारतीय शिक्षणक्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडून येतील.” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांनी ” भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ” या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनप्रसंगी वरील विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 चर्चासत्राच्या उद्घटनास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ऍड.मोहनराव देशमुख तसेच चर्चासत्राचे बीजभाषक कर्नाटकमधील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, बेळगावीचे प्रा.डॉ.बसवराज कुडाचीमठ, वैष्णव कॉलेज चेन्नई येथील विषयतज्ज्ञ डॉ. आर.शुभश्री व डॉ. शामला स्वामिनाथन ,न्यू आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ.मंगेश वाघमारे इ. मान्यवरांची उपस्थिती होती. अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक, अभ्यासक, संशोधक,विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. 

   ” २०२० चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता २०२२ पासून लागू होत असून ते विद्यार्थी व सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचायला हवे,या हेतूने या चर्चासत्राचे आयोजन केले ” असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी. सातव यांनी स्वागतपर मनोगतात सांगितले.वाणिज्यविभागप्रमुख प्रा.डॉ. सुनीता डाकले यांनी प्रास्ताविक केले. बीजभाषणात डॉ. कुडचीमठ यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, गुणात्मकता आणि क्षमता यांच्यात वाढ करणारे असून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे सुरक्षित बनविणारे आहे ” असे विचार मांडले. दुसऱ्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी स्थानिक कौशल्याला प्राधान्य देणारे हे शैक्षणिक धोरण यशस्वी झाल्यास भारताचे एक पावूल विश्व गुरू होण्याच्या दिशेने पडलेले असेल असे विचार व्यक्त केले.

डॉ. मंगेश वाघमारे यांनीही चर्चासत्रात मार्गदर्शन केले.

             दि.१७ रोजी बेळगावी, कर्नाटक येथील प्रा.डॉ. श्रीनिवास पाटील यांनी ” नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : संधी” या विषयाची मांडणी केली. कौशल्यधारीत शिक्षणाकडे लक्ष्य केंद्रीत करणे गरजेचे असून हे धोरण सर्वसमावेशक आहे. भारत या धोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करू लागेल.” असे विचार व्यक्त केले.हे सत्र ऑनलाईन स्वरूपाचे झाले.मुंबई येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख डॉ. कांचन फुळमाली यांनी या धोरणाची पाच पायाभूत तत्वे सांगून ही शिक्षणपद्धती दर्जेदार व परवडणारी असेल हे स्पष्ट केले. पिंपरी, पुणे येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या डॉ. मानसी कुर्तकोटी यांनी प्रत्येक शिक्षक हा टेकनॉसेवी असला पाहिजे, त्यांनी आता विस्तारित दृष्टिकोन ठेवावा अशी मांडणी केली.मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मधून डॉ. दिलीप चव्हाण यांनी सुद्धा अनमोल मार्गदर्शन केले.

                या राष्ट्रीय चर्चासत्रास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. ना.अजितदादा पवार यांनी शुभेच्छा दिल्या. पुजिशिमंचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानदसचिव मा. संदीप कदम, खजिनदार मा.मोहनराव देशमुख, उपसचिव ए.एम.जाधव, सहसचिव मा.एल.एम. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शिरूरचे आमदार मा.अशोक पवार, उद्योजक राम निंबाळकर,वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके,बा.रा. घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.झावरे , प्राचार्य डॉ. शर्मिला चौद्धरी ,प्रा.डॉ. संगीता जगताप यांचीही या चर्चासत्रात उपस्थिती होती.या चर्चासत्राचे संयोजन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनिता डाकले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मेघना भोसले यांनी केले . उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ.सपना राणे,ग्रंथपाल तुषार दिलपाक, प्रा. भोईटे,प्रा. शिंदे, गणेश साबळे , इ.चे सहकार्य मिळाले. डॉ. सपना राणे व डॉ. श्रीनिवास इपल्पल्ली यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती : द्रौपदी मुर्मू

yugarambh

होलार समाजाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त वैचारिक जयंती महोत्सव हर्षाने संपन्न .

yugarambh

उत्कर्ष विद्यालय सांगोलाची प्रतापगड- रायगड दर्शन सहल उत्साहात संपन्न!

yugarambh

रत्नाई चषक बुद्धिबळ स्पर्धा_२०२३ चा उदघाट्न समारंभ संपन्न 

yugarambh

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कला दिग्दर्शकाची आत्महत्या… कारण काय…..?

yugarambh

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने ‘परंडा भुईकोट किल्ल्याची ‘ स्वच्छता मोहिम.

yugarambh

Leave a Comment