अकलूज (युगारंभ )-महर्षि जिमखाना शंकरनगर व स्पोर्ट्स असोसिएशन तसेच महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवपार्वती मंदिर, शंकरनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले. सकाळी आरतीच्या नंतर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.धैर्यशील मोहिते पाटील,मा.सौ. शितलदेवी मोहिते पाटील तसेच मा.श्री. सत्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते खिचडी वाटपाला प्रारंभ झाला. महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभागाच्या बालचमुंन्नी एक छोटी वाटी शेंगदाणा व छोटी वाटी शाबुदाणा एकत्र करून या कार्यक्रमांमध्ये देवून आपला खारीचा वाटा उचलला.
खिचडी वाटपाचा उपक्रम शिवरात्रीच्या निमित्ताने गेली 35 वर्ष या ठिकाणी अखंड चालू आहे तसेच महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभागाच्या वतीनेही गेली दहा वर्ष या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून शिवभक्तांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे, अनिल जाधव सर, अशोक गोडसे, जयवंत माने देशमुख, आप्पा गायकवाड, दादा भाकरे, बापू सरतापे, गणेश लोकरे, रणजीत जगताप, श्रीकांत भोसले, समीर बागल आणि रवी पवार तसेच महर्षि प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.