लवंग (युगारंभ)-सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज व महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती शंकरनगर -अकलुज यांचेवतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी दि.१७,१८ व १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत त्रिमुर्ती चषक व वजनगट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाट्न महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते ‘शिवतीर्थ आखाड्याचे’ पूजन करून करण्यात आले.
या स्पर्धेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटक मा. श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन कुस्ती कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले.
यंदा स्पर्धचे हे ४४ वे वर्ष असून यामध्ये पुणे, कोल्हापूर, बारामती,पंढरपूर, कुर्डुवाडी, खवासपूर, टेंभुर्णी, कंदर, सदाशिवनगर, नातेपुते, खुडूस, वाफेगांव, अकलूज मधील एकूण ६५२ पैलवानांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे मुख्य आकर्षक असलेल्या ‘त्रिमूर्ती चषक’ या खुल्या गटासाठी एकूण ६२ पैलवानांनी नोंदणी केली.
आज कुस्त्यांच्या दोन फेऱ्या पार पडून यामध्ये पै.संतोष जगताप, पै.धनाजी कोळी, पै.प्रमोद सूळ, पै.रवि चव्हाण, पै.कालिचरण सोलनकर या नामवंत मल्लांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
याप्रसंगी मल्लसम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, स.म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे, भिमराव काळे, नरेंद्र धुमाळ ,स्पर्धा प्रमुख वसंत जाधव, सचिव पोपट भोसले-पाटील, राष्ट्रकुल स्पर्धेचे विजेते राम सारंग, अरविंद वाघमोडे, दादा कोकाटे,उमेश भिंगे व नियोजनातील सर्व समिती प्रमुख व त्यातील सदस्य उपस्थित होते. आजच्या कुस्त्या अत्यंत रोमहर्षक पार पडल्या.