अकलूज (युगारंभ )-आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी श्री.जयसिंह मोहिते-पाटील पूर्व प्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साळुंखे सर (सहशिक्षक.अकलाई विद्यालय अकलूज) तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव अंधारे साहेब (सदस्य. प्रशाला समिती) हे होते.
आजचे प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व बालशिवाजी व जिजाऊ यांच्या वेशभूषामध्ये आलेल्या बालचमू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाल शिवाजी व जिजाऊ च्या वेशभूषामध्ये आलेले बालचमू अनेकांचे मन वेधून घेत होते.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील चि.प्रतीक सोनवणे या विद्यार्थ्यांनी पहाडी आवाजामध्ये पोवाडा गायला तसेच प्रशालेतील कु.भाग्यश्री मुजमुले, चि.जतीन कुमार कु.सुजाता नरवडे, कु.श्रावणी चोरमागे,कु. संतोषी नरवडे, चि.वेदांत घोडके कु.ज्ञानेश्वरी उबाळे, चि.गजानन उबाळे, चि.अवधूत पिसाळ या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आपले अनमोल विचार व्यक्त केले.
मुख्याध्यापक मा.श्री.बी.टी शिंदे सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आपण कशाप्रकारे अंगीकृत करून आपल्या जीवनामध्ये बदल करावा असे सांगितले तसेच आजचे प्रमुख व्याख्याते श्री. साळुंखे सर यांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे लढा दिला हे अनेक उदाहरणातून सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये अंधारे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त *गर्जा महाराष्ट्र माझा* हे गीत राज्यगीत म्हणून घोषित केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले व शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महादेवराव अंधारे साळुंखे सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.टी शिंदे सर प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.