छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून innovativeness,strategic planning ,सूक्ष्म नियोजन यांची सांगड आधुनिक वास्तव्याशी घालत यशाची शिखरे पादाक्रांत करा -प्रा.डॉ. विश्वनाथ आवड.
माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि संकुल येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते -पाटील यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर विश्वनाथ आवड -इतिहास संशोधक व साहित्यिक, ज्येष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे सभापती स्थानिक प्रशाला समिती यशवंतनगर पोपट भोसले पाटील सचिव प्रताप क्रीडा या मान्यवरांनी प्रतिमेला अभिवादन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला .उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान महर्षि संकुलाच्या वतीने करण्यात आला. महर्षि वाद्यवृंदाने नुकत्याच राज्यगीत म्हणून दर्जा मिळवलेल्या जय जय महाराष्ट्र माझा गीताचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संकुलातील विद्यार्थी सिद्धी वाघ ,आराध्या चुंगे ,मयूर मोरे यांनी आपल्या तडफदार भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शब्दांजली वाहिली.
डॉक्टर विश्वनाथ आवड आपल्या भाषणात म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सूक्ष्म नियोजन व परिपूर्ण प्लॅन आखूनच यशाचा केंद्रबिंदू गाठता येतो .अनेक प्रसंगाचा उहापोह करून त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचे निरूपण केले.
कार्यक्रमाप्रसंगी संकुलातील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न झाला. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रा. धीरज गुरव यांना सन्मानित करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, नितीन इंगवले देशमुख, अनिल जाधव, मुख्याध्यापिका सविता गायकवाड संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भारत जाधव,रचना रणनवरे,प्रतिभा राजगुरू, हासिरुन मुलाणी शिला धाईंजे,बिभीषण जाधव,मनोज सरवदे आकाश कदम ,अभिजित बावळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मुल्ला व किरण सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी मानले.