लवंग ( युगारंभ )- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी श्रीशिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त जि. प.प्रा. शाळा घरमाळकर गट, भिलारे वस्ती लवंग येथे छत्रपतींना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्तेही शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान, बहुजनांचा जाणता राजा, प्रजेबद्दल अतिव प्रेम असणारा, शौर्य व पराक्रमाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंतयोगी, राजा शिवछत्रपती यांच्या विचाराचा जागर याप्रसंगी मांडण्यात आला.
” जय भवानी,जय शिवाजी.”. “छत्रपती शिवाजी महाराज की जय..”
या घोषणांनी परिसर मंत्रमुग्ध झाला….
या शिवजयंतीनिमित्त दत्तात्रय पराडे सर, धनंजय पवार, प्रशांत भिलारे, लखन जाधव,युवराज भिलारे, किसन वाघमारे,केशव राक्षे, दादा बारकुंड, दादा ओहोळ, सचिन खंदारे,रियाज पठाण, येथील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.