लवंग (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ तथा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यालयातील पाचवी ते नववीच्या मुलींनी टाळ्यांच्या गजरात हसतमुखाने दहावीच्या मुलींचे स्वागत केले. मुलींनी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करून भेटवस्तू दिल्या.दहावीमधील ग्रीष्मा लावंड,भक्ती आसबे,हर्षदा जोशी व शाळेतील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त स्नेहल वाळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आठवणींना उजाळा दिला व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यालयातील शिक्षक सुनील कांबळे यांनी परीक्षेला सामोरे जाताना याविषयी मार्गदर्शन केले. कालाप्पा सुर्यवंशी व स्थानिक प्रशाला समितीच्या सदस्या मनीषा चव्हाण यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वाघ मॅडम यांनी मुलींना परीक्षेसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख, गोरख पिसे,प्रवीण गोडसे,दिग्विजय जाधव,मुक्ताबाई मिसाळ सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नववी इयत्तेतील मुलींनी केले होते.