December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे- बाळदादा

लवंग (युगारंभ )-ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. चिंतामुक्त जीवन जगावे. छंद जोपासावेत, आणि वृद्धापकाळात आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी केले. ताहेरा फाउंडेशन अकलूज आयोजित जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमातून अध्यक्ष पदावरून बाळदादा बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांची होती . तसेच प्रसिद्ध चार्टर अकाउंटट आर .सी. फडे हे उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी ज. अबूबकरभाई तांबोळी यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक मरहूम स्वर्गीय हाजी अब्दुल कादर साहेब यांची आठवण काढत त्यांचे अनेक सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या लोकांचे आभार त्यांनी प्रस्ताविकातून व्यक्त केले. जुन्या पिढीतील ज्या नागरिकांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना समाज आणि कुटुंब उपयोगी बनवलं त्या सर्व ज्येष्ठांचा सन्मान ताहेरा फाउंडेशन च्या वतीने बाळदादा आणि डॉक्टर इनामदार तसेच आर सी फडे यांच्या शुभहस्ते प्रत्येकाला सन्मानचिन्ह, मानाचा फेटा व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्कारमूर्तीतून बोलताना अबूबकर महंमद शेख साहेब यांनी शिक्षणाला महत्त्व असल्याचे सांगितले व स्वतःचे अनुभव त्यांनी सर्वांच्या समोर शेअर करत जाणीवपूर्वक इतरांना मदत करण्याचे आवाहन केले. ताहेरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. डॉक्टर इनामदार यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वतःपासून समाज निर्माण होतो आणि समाजातून देश निर्माण होतो. तसेच एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. ज्येष्ठांनी आपल्या नातवंडांच्या बरोबर वेळ घालवावा. आजोबा आणि नातू यांचे नातं हे वेगळंच असल्याचं त्यांनी सांगताना एक सुंदर गोष्ट उपस्थितांना सांगून सर्वांचे मन प्रफुल्लित केली.

सर्व सत्कार मूर्तींची नावे पुढीलप्रमाणे प्रा. अबूबकर महंमद शेख तांबवे. हाजी रसूल नदाफ यशवंतनगर. हाजी अली भाई पाटावाला अकलूज. अब्दुल लतीफ करीम शेख माळशिरस. श्री शंकरराव नारायण देशपांडे अकलूज. श्रीमती सुभद्रा वसंत लोंढे अकलूज. मलिकसाहेब बाबनभाई पठाण वरकुटे तालुका इंदापूर.हाजी चांद काझी अकलूज. शकूर खान आमिरखान पठाण चांदापुरी.दस्तगीर काशीम शेख अकलूज. शेरखान दाऊद खान पठाण अकलूज. मेहबूब चांद मुलाणी अकलूज. रहीम अली शेख गणेशगाव. श्री विश्वनाथ पांडुरंग शेटे गुरुजी अकलूज. श्री अर्जुन शंकर बनसोडे माळीनगर. जैनुद्दीन वजीर शेख अकलूज. युसूफ साहेबलाल शेख अकलूज.हाजी.खलील मेहताब देशमुख संग्रामनगर,खलील अब्बास मुलांणी माळशिरस. हाजी सुलेमानशहा मकानदार अकलूज. हाजी अहमदभाई बागवान. जिलानी शेख अकलूज. ॲड. शब्बीर जमादार अकलूज. रफीक पठाण अकलूज.
 सत्कारमूर्तींच्या सोबत कार्यक्रमाला आलेल्या कुटुंबातील नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान होताना पाहून खूप आनंद दिसून येत होता. नातेवाईकांनी उपक्रमाबद्दल खूप समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी डॉ. अब्दुल कलाम आझाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी युसूफ तांबोळी, हाजी बशीरभाई तांबोळी, ॲड. वजीर शेख, मुख्तार कोरबू, भैया माढेकर, हमीद मुलाणी ; अब्बास तांबोळी,दादा तांबोळी,सलीम शेख तनवीर तांबोळी, सत्कारमुर्तीचे नातेवाईक इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील मुलाणी सर यांनी तर आभार ईलाही बागवान सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ताहेरा फाउंडेशनचे हाजी असलम तांबोळी, शाकीर तांबोळी, शहीद तांबोळी, शादाब तांबोळी,जाकीर भाई तांबोळी,शौकत तांबोळी यांनी परिश्रम घेतले .

Related posts

माळीनगर येथे किर्तीध्वज मोहिते- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात .

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालय ‘स्पोकन इंग्लिश’ विषयावर कार्यशाळा संपन्न

yugarambh

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य……

yugarambh

प्रगत व कृतिशील विचारधारा मा. गणेशजी करडे सर

yugarambh

अकलूज येथे हृदयरोग व मधुमेह मार्गदर्शन शिबीर संपन्न

yugarambh

अकलूज गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

yugarambh

Leave a Comment