December 1, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हापरिसर

जिजामाता कन्या प्रशालेत विविध उपक्रमांनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

माळीनगर (युगारंभ )-  कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

  यावेळी पोवाडा, भारुड, गवळण, लावणी,, वासुदेव, पिंगळा, ओव्या अशा विविध कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण झाले.त्यानंतर ग्रंथापूजा करून ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी प्रशालेतील सर्व मुली ग्रंथदिंडीत सहभागी झाल्या व मराठीचा जागर केला.

  या दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यीक प्रशांत सुरुडकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र ही पराक्रमी योद्ध्यांची , संतांची व थोर साहित्यिकांची भूमी आहे.मराठी भाषेमुळे महाराष्ट्राला वैभव प्राप्त झाले आहे.

मुख्याध्यापिका वाघ मॅडम यांनी साहित्यिकांनी रचलेल्या विपुल साहित्य रचनेमुळे मराठी भाषा ही महाराष्ट्राची आण, बाण,शान बनली आहे असे गौरवोद्गार काढले.यावेळी विद्यालयातील मराठी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

     यावेळी स्टेजवरती पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख, मराठी विभाग प्रमुख गोरख पिसे,लोकनेता न्यूज चॅनलचे प्रमुख रमेश साळवे,कलाप्पा सुर्यवंशी, प्रवीण गोडसे उपस्थित होते.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुराधा कांबळे,राजश्री कणबुर, सुहास पवार,शोभा खराडे,सोनाली चौधरी,माधुरी भांगे व रोहित माने यांनी  परिश्रम घेतले.

Related posts

Prakash Ambedkar : देशात कोरोना मोदी घेऊन आले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप 

Admin

माळशिरस तालुक्यात लंपीच्या लसीचा काळाबाजार… पशुवैद्यकिय अधिकारी व खाजगी व्यक्तींची मिलीभगत

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळेत क्रांतीदिन उत्साहात साजरा 

yugarambh

सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांना संग्रामनगर येथे अभिवादन

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात वृक्षारोपणासाठी रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

yugarambh

ताराराणीचे पहीले राष्ट्रीय पदक..!-मा. धैर्यशील मोहिते -पाटील

yugarambh

Leave a Comment