माळीनगर,(युगारंभ )-ता.१:येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेतील शिक्षक सत्यवान विठ्ठल साळुंखे (वय ५३) यांचे बुधवारी (ता.१) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सून असा परिवार आहे.बावडा (ता.इंदापूर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवेत असलेल्या सुमन साळुंखे यांचे ते पती होत.