माळीनगर (युगारंभ )-बज्मे अनवारे सुफिया मदरसा, अकलूज मधील नूतन आलीम, नूतन कारी व नूतन हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला ‘ ट्रॅव्हलिंग बॅग’ हाजानी माँ ताहेराबी तांबोळी यांचे हस्ते देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण शरीफच्या पठणाने झाली. अकलूज मधील बज्मे अनवारे सुफिया मदरसा हा सोलापूर जिल्ह्यातील उत्तम मदरशा पैकी एक मदरसा असून या मदरशाच्यासाठी कष्ट घेणाऱ्या मौलाना नियाज अहमद अल्वी, हाफीज व कारी रफिकसाहब आणि मौलाना अब्दुल वाहिद सहाब यांचा गौरव ट्रॅव्हलिंग बॅग, हाजी रुमाल आणि गुलाब पुष्प देऊन फाउंडेशन चे अध्यक्ष हाजी अबूबकरभाई तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मरहूम हाजी अब्दुल कादरभाई यांचे मदरशासाठीच्या योगदानाचीही आठवण काढण्यात आली.सर्व विद्यार्थी या खाजगी कार्यक्रमाने भारावून गेले होते.या विद्यार्थासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व मौलानांचे आभार व कौतुक करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या पालकांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले.सर्व उपस्थित मौलानांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.तर सर्व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला.
हाफिज पदवी प्राप्त केलेल्यांची नावे हाफिज मेराज रजा, हाफिज अजमत आलम, हफिज गुलाम हसन, हाफिज संजर, हाफिस महमूद,हाफीज उस्मान, हाफिज शाहिद, हाफिज आबू सालेह, हाफिज शहेबाज, हाफिज गुलाम हुसेन, कारी पदवी प्राप्त केलेले कारी सरवर,कारी आयान, कारी मोहम्मद रजा, आलिम पदवी प्राप्त केलेले मौलाना सादत हुसेन, मौलाना सोहेल रजा,मौलाना मेहराज रजा.
सदर कार्यक्रमाला ताहेरा फाउंडेशनचे खजीनदार हाजी असलमभाई तांबोळी,शादाब तांबोळी,शाहिद तांबोळी,शकिल मुलाणीसर,इलाही बागवान सर उपस्थित होते.