माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता वाघ मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ तेजश्री नरुळे व अकलूज नगरपरिषदेच्या स्वछता विभागातील सौ हेमताई लोखंडे,सौ प्रियांका पाटोळे,शाहीरा शेख,मुनेरा बागवान व गीता सोळंकी तसेच विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
मुलींनी पारंपरिक वेष परिधान करून विविध थोर महिलांच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. यावेळी मुलींनी समूहनृत्य सादर केले.
कु. लक्ष्मी गोसावी हिने भाषण केले. मुख्याध्यापिका सौ सुनीता वाघ मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख यांनी सर्व मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता सातवी ब मधील मुलींनी केले होते.
प्रास्ताविक कु साक्षी ढाकणे हिने केले.सूत्रसंचालन भक्ती जाधव,वैष्णवी अनपट व श्वेता गिरमे हिने केले तर सई शिंदे हिने आभार मानले.