लवंग (युगारंभ )-जि. प. प्रा. शाळा घारमाळकर गट लवंग ता. माळशिरस येथे कष्टकरी, कामगार महिलांचा सन्मान करून समस्त स्त्री वर्गाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त महिलांच्या हस्ते करण्यात आले. आठ मार्च रोजी संपूर्ण जगभरात महिलांचा सन्मान करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून , स्वकर्तुत्वाने व स्वकष्टाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या व आपल्या जोडीदाराबरोबर संसाराला साथ देणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान लवंग ग्रामपंचायत सदस्या मंजुषा भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी हर्षदा भिलारे, वनिता भोईटे, रेश्मा राक्षे, कुसुम धंगेकर, दिपाली कांबळे,छाया पवार, वैशाली भिलारे, रुक्मिणी काळेल, अरुणा कांबळे, बायडाबाई कांबळे, सरिता भोईटे, अपर्णा पवार, पौर्णिमा खंदारे, वर्षा भिलारे, ताई भिलारे, अंजली पाटोळे, आशा वाघमारे, सुनिता वाघमारे इ. महिलांचा आणि शाळेतील मुलींचाही गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक पराडे सर व सावंत सर यांनी केले.